Showing posts with label Yeur. Show all posts
Showing posts with label Yeur. Show all posts

Monday, October 26, 2009

वाइल्ड लाइफ तिच्या 'डोळ्यां'तून



अंड आणि त्याला पडलेलं छोटसं भोक आणि त्यातून कोणीतरी अन्नरस शोषून घेतल्याची फ्रेम... लहान मुलांचं होणारं शोषण यावर काढलेला हा फोटो पाहिल्यावर मन विचार करायला लागतं..

काळसर तपकिरी रंगाची विंचवाची मादी आणि तिच्या पाठीवर असलेली छोटसं पिल्लू... आक्रमकतेने दंश करण्यासाठी तयार असलेला हिरवा साप... निसर्गातल्या विविध वन्य प्राण्यांना आपल्या कॅमेरारूपी डोळ्यांनी टिपलंय ठाण्यातल्या तरुण वाइल्डलाइफ फोटोग्राफर वेदवती पडवळने.

नुकताच अमरावतीच्या 'नेचर कन्झरव्हेशन सोसायटी', 'मेळघाट टायगर रिर्झव्ह', झूओलॉजी विभाग आणि एसजीबी, अमरावती युनिर्व्हसिटी यांच्यावतीने घेण्यात आलेल्या फोटोग्राफी स्पधेर्मध्ये वेदवतीच्या 'स्कॉपिर्अन विथ बेबीज' या फोटोला प्रथम पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलंय. तसंच डिपार्टमेण्ट ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलजीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरच्या फोटोग्राफी स्पधेर्मध्ये 'कॉन्सेप्टच्युअल' विषयातल्या 'चाइल्ड अॅब्यूज' या छायाचित्राला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जाहीर झालं आहे.

युरोप खंडामध्ये २४ मे 'नॅशनल पार्क डे' म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने तिथे जगभरातल्या नामांकित फोटोग्राफर्सची निवडक छायाचित्र प्रदशिर्त केली जातात. गेली दोन वर्षं वेदवतीचे फोटो या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात प्रदशिर्त होत आहेत. 'फोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडिया'च्या बाराव्या आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी प्रदर्शनात तिचे फोटो रसिकांच्या पसंतीस उतरले होते. गेल्या वषीर् केरळमध्ये 'बटरफ्लाय आर्ट फाऊंडेशन'ने भरवलेल्या प्रदर्शनात तिला 'सटिर्फिकेट ऑफ एक्सलन्स'ने सन्मानित केलं होतं. ४९व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनातही तिची छायाचित्रांना रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.

वेदवती जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ आर्टच्या कमशिर्यल आर्ट शाखेची पदवीधर. फोटोग्राफी हा तिचा खास विषय आणि तिची पॅशन. गेली पाच वर्षं सातत्याने ती फोटोग्राफी करत आहे. त्यातही नेचर आणि वाइल्डलाइफ फोटोग्राफी हा तिचा आवडता विषय. ठाण्यातले वाइल्डलाइफ फोटोग्राफर युवराज गुर्जर यांच्यासोबत ती साताऱ्याजवळच्या कास पठारावर गेली होती. तिथे तिथला निसर्ग आणि तिथल्या अद्भुत वन्यजीवनाशी, सजीवांशी परिचय झाला. जंगलातली जैवविविधता, निसर्गाचे विभ्रम यांनी तिच्या मनाला भुरळ घातली आणि तिचा वाइल्डलाइफ फोटोग्राफीचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. भारतातल्या गोरूमारा, गीर, वेलावदार, जिम कॉबेर्ट, कान्हा, बांधवगड, भरतपूर, रणथंबोर, बोंडला अशा अनेक जंगलांत आणि अभयारण्यांमध्ये जाऊन तिने आपली 'पॅशन' जपली. याकाळात तिने वन्यप्राण्याचं जीवन आपल्या कॅमेऱ्याने अत्यंत कल्पकतेने टिपलं. त्यातही तिने टिपलेले वाघांचे फोटो पाहण्यासारखेच आहेत. वाघांचे फोटो काढणं ही तिची खास आवड असल्याचं ती सांगते.

आपलं वेड जोपासण्यासाठी ती दर रविवारी येऊरच्या जंगलामध्ये फिरायला जाते. तिथेच तिला एक नवी वाट मिळाली ती 'मायक्रो' फोटोग्राफीची. यामध्येही तिने आपलं कसब दाखवलं आहे. कमी वयात वेदवतीने आपल्या करिअरचा खूप पुढचा टप्पा गाठला असून तिने व्यवसाय म्हणूनही हेच क्षेत्र निवडलं आहे. ठाण्यात तिचा स्वत:चा स्टुडिओही आहे.

तिच्या या पॅशनबद्दल ती सांगते, जंगलातल्या खाचखळग्यांच्या आणि धुळीच्या रस्त्यांवरून फिरणं, जीपमधून तासन्तास भटकणं मला आवडतं. निसर्गाची अद्भुत रूपं पाहिल्यावर मन चकित होतं आणि तेच मी माझ्या कॅमेरात पकडण्याचा प्रयत्न करते. जंगलामध्ये जीपमधून १५-२० फुटांवरच्या वाघाचं किंवा प्राण्याचा फोटो काढण्यासाठी मानसिक संतुलन पक्कं असावं लागतं. त्यासाठी मेहनत आणि सरावाची गरज असते.

- प्रकाश पिटकर
Story


Tuesday, May 12, 2009

येऊरच्या संपदेत चार नवीन प्रजाती!

शशिकांत कोठेकर
मुंबई, पुण्याकडील हरित क्षेत्र वाढत्या शहरीकरणामुळे कमी होत असताना या परिसरात कीटकांच्या चार नवीन प्रजाती आढळून आल्याने निसर्गप्रेमींत काहीसे उत्साहाचे वातावरण आले आहे.
ठाण्यातील येऊरचे जंगल, मुरूडचे फणसाड अभयारण्य तसेच पुणे शहर या ठिकाणी हे नवीन कीटक आढळून आले आहेत. रातकिडे प्रकारात मोडणारे हे कीटक असून ते निशाचर आहेत. कीटक अभ्यासक अमोल पटवर्धन यांना डॉ. आर.पी. आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली कीटकांवर संशोधन करीत असताना कीटकांच्या चार प्रजाती नव्याने आढळून आल्या. पोलंडहून प्रकाशित होणाऱ्या ‘जिनस’ या आंतरराष्ट्रीय मॅगझिनमध्ये कीटकांच्या नवीन प्रजातींबद्दल शोधनिबंध प्रकाशित झाल्याने कीटक संशोधनाला वेगळे महत्त्व आले आहे.
येऊर हे ठाणे शहरातील जंगल नैसर्गिक विपुलतेने भरलेले आहे. बिबळ्या, हरणे, विविध सरपटणारे प्राणी, फुले, झाडे यांनी हे जंगल समृद्ध आहे. या जंगलात कीटक, झाडे यांच्या अभ्यासासाठी अमोल पटवर्धन अनेकदा जातात. मातकट रंगाचा साधारणत: १४ मिमी लांबीचा कीटक या जंगलात आढळला. इतर कीटकांपेक्षा हा थोडा वेगळा आढळला. त्याचे आकारमान, पद्धती, रंग यानुसार त्याचे ‘पंक्टोडीनियस इंडिकस’ असे शास्त्रीय नामकरण करण्यात आले. या कीटकाच्या अळ्या मातीत असतात. सहा ते बारा महिने अळी राहते. झाडांच्या मुळावर या कीटकाच्या अळ्यांचे पोषण सुरू असते. त्यांच्या शोषणाने झाड मात्र काही दिवसात मरते. अळीतून कीटक बाहेर आला की, पानावर, दगडांवर, पानाच्या- खोडाच्या मागे दिवसा हे कीटक असतात. रात्री मात्र दिव्यांवर उडत हे कीटक येतात. मायक्रोस्कोपखाली पुणे शहरातही असाच रात्री दिव्यांवर येणारा कीटक आढळला. त्याचे नामकरण पंक्टोडिनियस बायफॉरेस्ट करण्यात आले.
इतर दोन कीटक मुरूडच्या फणसाड येथील जंगल परिसरात संशोधन करताना आढळले. मेट्रिअॅलीकस बायकलर व एक्सान्थोपेन्थस तांडेली हे दोन कीटक मुरूडच्या जंगलात आढळले. मेट्रिअॅलीकस बायकलर या कीटकाचे पंख तांब्याच्या रंगाचे असतात. काळे डोके आणि पंख तांबूस रंगाचे अशा द्विरंगात असलेला कीटक १४ ते १५ मिमी लांबीचा असतो, तर एक्सान्थोपेन्थस तांडेली हा कीटक पूर्णपणे काळ्या रंगाचा असतो. फणसाडयेथील जंगलात हे दोन्ही कीटक आढळले.
निवृत्त वन अधिकारी सुधीर तांडेल यांनी कीटकांच्या अभ्यासात अमोलला खूप सहकार्य केले. त्यांच्या सन्मानार्थ या काळ्या रंगाच्या नवीन कीटकाच्या नावात शेवटी सुधीर तांडेल यांचे आडनाव जोडून तांडेली नाव करण्यात आले. पोलंड येथून प्रकाशित होणाऱ्या ‘जिनस’ व इतर मॅगझिनमध्ये अमोलचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला.

Article on Lokasatta website