राजेंद्र पाष्टे - सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी - विणीच्या हंगामात माडावर घरोबा करणाऱ्या गिधाडांच्या प्रजाती संरक्षित करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रती नारळामागे शेतकऱ्याला भरपाई देण्यात येणार आहे. वनविभाग आणि कृषी विभागातर्फे ही "गिधाड संरक्षित मोहिम' राबविण्यात येणार असून घरटी असलेल्या शेतकऱ्यांना त्यामुळे भरपाईचा "नारळ' मिळणार आहे.
जीवसृष्टीच्या श्रुंखलेत गिधांडाचे महत्व शास्त्रज्ञांनी अधोरेखित केले आहे. गिधाड अन्नसाखळीतील महत्वाचा घटक आहे. दापोली तालुक्यात गिधाड संरक्षित केंद्रही स्थापन करण्यात आले आहे. वाघ या वन्य प्राण्यानंतर दुर्मिळ होत चाललेल्या पक्षी वर्गातील गिधाडाचा क्रमांक दुर्मिळ जातीत दुसरा मानला जातो. नैसर्गिक कचरा निचरा व्यवस्थापनात गिधाड हा पक्षी नैसर्गिकरीत्या पर्यावरण स्वच्छ करण्याच्या कामात महत्वाचा घटक आहे; मात्र त्याची संख्या आता रोडावली आहे. अलीकडेच झालेल्या पक्षीगणनेत ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यासाठी आहे त्या गिधाडाच्या जातींना संरक्षित करण्यासाठी वन आणि कृषी विभागातर्फे सयुंक्त मोहिम राबविण्यात आली आहे.
गिधाड संरक्षण मोहिम आणि भरपाई
* नारळाचे हंगामातील प्रती झाड उत्पादनाचा दाखला अधिकाऱ्यांकडून घ्यावा.
* गिधाडांची घरटे नारळाच्या झाडावर असल्याचा वनविभागाचा दाखला.
* त्यानुसार प्रत्येक हंगामात प्रती फळ सात रुपये किंवा चारशे रुपये भरपाई.
* गिधाडाचा विणीचा हंगामसंपेपर्यंत घरट्याला संरक्षण आणि नारळाला भरपाई.
संपूर्ण बातमी

No comments:
Post a Comment