Monday, August 8, 2011

जुहू किनारी तेलगळती सुरू

मुंबईजवळच्या समुद्रा अडकलेल्या बोटींमधून तेलगळती सुरू झाल्याचे सांगितले जात असून, जुहू किना-यावर तेलाचे तवंग दिसू लागले आहेत. त्यामुळे सावधानतेचा इशारा म्हणून रविवारी पर्यटकांनी गजबजणा-या जुहू किना-यावर जाऊ नका, अशी सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहे.

गुरुवारी ४ ऑगस्ट रोजी मुंबईपासून २२ सागरी मैल अंतरावर बुडालेल्या ' एमव्ही रॅक ' या जहाजातून तेलगळती सुरू होण्याची भिती आधीपासूनच वर्तवली जात होती. आता जुहूच्या किना-यावर तेलाचे तवंग दिसू लागल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. तटरक्षक दलाने ' ऑपरेशन पर्यावरण सुरक्षा ' सुरू केले असून, ' समुद्रप्रहरी ' या बोटीच्या मदतीने तेलगळतीचा धोका कमी करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.

आज सकाळपासूनच जुहूच्या किना-यावर हे तवंग दिसू लागले. परंतु हे तवंग ' एमव्ही रॅक ' मधून गळणा-या तेलाचे आहेत, की जुहू किना-यावर अडकलेल्या ' पवित ' या जहाजातून गळणा-या तेलाचे आहेत याबद्दल निश्चित माहिती मिळत नाही. परंतु या तेलगळतीमुळे सागरी पर्यावरणाला धोका पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, तटरक्षक दलाच्या मदतीसाठी महापालिका, अग्निशमन दल आणि मुंबई पोलीस जुहू किना-यावर सज्ज आहेत. या तेलगळतीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी मुंबईकरांनी आणि पर्यटकांनी आज जुहू किना - यावर येणे टाळावे अशा सूचना केल्या आहेत.

या जहाजांच्या टाक्यांमध्ये साधारणतः २९० टन इंधन आणि ५० टन डिझेल असते. त्यामळे ते बाहेर आल्यास मोठ्या प्रमाणात सागरी प्रदूषण ओढवू शकते, हे ध्यानात घेऊन सतर्कता बाळगावी लागणार आहे.

बुडालेल्या ' एमव्ही रॅक ' या जहाजातील ६० हजार टन कोळसा हा बंद कप्प्यांमध्ये असला, तरी तो बाहेर आल्यास सागरी पर्यावरणाला नेमकी कशी हानी पोहोचेल, हे सांगता येत नाही. कोळशाच्या परिणामांवर फारसा शास्त्रीय अभ्यास झालेला नाही. मात्र तेलतवंग पसरल्यास किनारपट्टीलगतच्या खारफुटीला व तेथे नव्याने रुजणाऱ्या खारफुटीचा गळा घोटला जातो, हे चित्रा-खलिजिया टकरीच्या वेळीही स्पष्ट झाले, याकडे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या अभ्यासक स्वप्ना प्रभू यांनी लक्ष वेधले.

मुंबईलगत आढळणारी अविसिया मरिना ही खारफुटीची प्रजाती तुलनेने नव्या वातावरणाशी जुळवून घेणारी आहे, असे त्यांनी सांगितले. गेल्यावषीर्प्रमाणेच याही वर्षी खारफुटीचा बीजारोपणाचा काळ असतानाच ही दुर्घटना घडल्याने सतर्कता मात्र ठेवावीच लागेल. शुक्रवारी दुपारी वसोर्व्यात पवित जहाजातूनही तेल बाहेर येत असल्याची चर्चा होती. मात्र ते सामग्रीभोवतीचेच तेल असावे, ही गळती नाही, असे संरक्षणदलाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.    



Full Story

No comments:

Post a Comment