Thursday, January 3, 2013

"ज्युरासिक पार्क'सारख्या प्रयोगशाळेत जनुकांद्वारे जन्माला येणार दुर्मिळ साप


औरंगाबाद - ज्युरासिक पार्कमध्ये ज्याप्रमाणे एका डासातील रक्ताच्या थेंबातून "डायनासोर'ची निर्मिती "हॉलिवूड'ने केलेली चित्रकृती आपण पाहिली आहे, त्याच धर्तीवर आता सापाच्या कातीपासून दुर्मिळ साप जन्माला घालण्याचे तंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाने विकसित केले आहे.

दुर्मिळ सापांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत जन्माला घालणे शक्‍य होणार आहे, मात्र यासाठी हवी सापांच्या काती.

राज्यातली पहिली जनुकं बॅंक 

विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागातील पॉल हॉर्बर्ट सेंटर फॉर डीएनए बारकोडिंग ऍण्ड बायोडाव्हर्सिटी स्टडीज येथे यासाठी महाराष्ट्रातील सापांची पहिलीच जीन (जनुकं) बॅंक तयार करण्यात येत असून यासाठी 130 सापांच्या कातींचे संकलन करून डीएनए काढून डाटा कलेक्‍ट केला आहे.
"ज्युरासिक पार्क'सारखाच प्रयोग आता सापांच्या बाबतीत शक्‍य होणार असल्याचा दावा विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे.

साप हा मित्रच 

सापांच्या जेवढ्या जाती आता आहेत, त्यापैकी काहीच विषारी आहेत. शेतीत पिकणाऱ्या धान्यापैकी 90 टक्के धान्याची नासाडी उंदीर, कीटक, बेडूक करतात. या नासाडी करणाऱ्या प्राण्यांची संख्या नियंत्रित करण्याचे काम साप करतात. त्यामुळे साप हा शेतकऱ्यांचा आणि पर्यायाने माणसाचा मित्र आहे.सापांच्या जाती नष्ट होऊ नये म्हणून 

दिसला साप की मार अशा मानवी प्रवृत्तीमुळे सापांच्या काही जाती दुर्मिळ होत आहेत. तसेच सापांच्या विषाचा विशेषत: कोब्रा जातीच्या सापाच्या विषाचा औषधीमध्ये वापर केला जातो. अशा माणसांचा मित्र असणाऱ्या सापांच्या जातींचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी सापांची जीन बॅंक तयार करण्यात येत आहे.

फक्त 33 सापांच्या जाती 

देशामध्ये सुमारे 270 सापांच्या जाती आढळतात, त्यापैकी महाराष्ट्रात 33 जाती आहेत. देशभरात विशेषत: महाराष्ट्रात आढळणाऱ्या सर्वच प्रकारच्या सापांची माहिती या सेंटरच्या संकेतस्थळावरून जगभरातील सर्पतज्ज्ञ व सापांविषयी अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना उपलब्ध होणार आहे.

एका क्‍लिकवर सापांची माहिती - डॉ. जी. डी. खेडकर 

"" सापाची कात "पॉल हॉबर्ट सेंटर'कडे प्राप्त झाल्यानंतर त्या कातीविषयीची सर्व माहिती त्या नमुन्याला कोड देऊन संकलित केली जाणार आहे. या नमुन्यातील थोडी कात घेऊन डीएनए घेण्यात येतो. डीएनए जनुकं साठा करण्याच्या गुणवत्तेचा तयार झाला आहे? का नाही? याची चाचणी घेण्यात येईल. जर ती जनुके नवीन क्‍लोन तयार करण्यास योग्य झाली असली, तर त्याचा संग्रह केला जाणार आहे. तो तर काही जणुके कातीच्या आधारे त्या सापाची जात ओळखण्यासाठी तयार झाले आहेत किंवा नाही, हे उपकरणाद्वारे "ऍम्पलीफाय' करतो. या प्रक्रियेनंतर जनुक साखळीचे डीएनए सिक्‍वेन्सर उपकरणाने उकलन करण्यात येते. त्यानंतर जैवविश्‍लेषण म्हणजे त्याचा अभ्यास केला जातो. कातीपासून प्राप्त झालेल्या माहितीचे व लायब्ररीतील सापांच्या संग्रहित व प्रमाणित माहितीशी तुलनात्मक अभ्यास करून त्या सापाच्या जातीची ओळख करण्यात येते व तो कोणत्या भागात अधिक प्रमाणात आढळतो, त्याच्या सवयी, त्याचा आहार , वंशावळ, विविध भागात आढळत असल्यास त्याची जनुकीय भिन्नता, अशी माहिती तयार करून सेंटरमधील देशाच्या नकाशामधील भागांमध्ये नोंदी करून या सेंटरच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. सापाच्या कातीपासून सापांचा डीएनए काढण्याचे स्वस्तातील व सोपे तंत्र पॉल हॉर्बर्ट सेंटरने विकसित केले असून या तंत्राच्या आधारे हे शक्‍य होणार आहे.''

कात सापडली तर जग घेईल तुमची दखल ! 

साप कधी वृद्ध होत नसतो. सापाने कात टाकली की तो पुन्हा तरुण होत असतो असे मानले जाते. शेतामध्ये, जंगलात, नदी-ओढ्याच्या काठाने असलेल्या जाळीत, कपारीत साप कात सोडत असतो. अशी कात सापडली तर पूर्णपणे वाळल्यानंतर नागरिकांनी साध्या पाकिटामध्ये टाकावी आणि ते पाकीट दुसऱ्या पाकिटात टाकावे. कातीसोबत स्वत:चे नाव, पूर्ण पत्ता, सापाची कात नेमकी कोणत्या भागात, कोणत्या ठिकाणी सापडली याची माहिती या माहितीसह पॉल हॉर्बर्ट सेंटर फॉर डीएनए बारकोडिंग ऍण्ड बायोडाव्हर्सिटी स्टडीज, प्राणिशास्त्र विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, पोस्ट बॅग क्रमांक 2 औरंगाबाद या पत्त्यावर पाठवावे. पाकिटाला कोणतेही तिकीट न लावता पाठवावे, हा पाठवण्याचा तिकिटाचा खर्च हे केंद्र करणार आहे. कातीच्या पूर्ण अभ्यासानंतर संकेतस्थळावर टाकण्यात येणाऱ्या माहितीमध्ये कात पाठवणाऱ्याचे नाव व पाकिटासोबत दिलेली सर्व माहिती टाकण्यात येणार असल्याचे डॉ. खेडकर यांनी सांगितले.

Original post


3 comments:

 1. Send Flowers to India, Send Flowers in India, Send Flowers online India, Sending flowers to India, Flowers in India, Send Flowers online to India, Send cakes to India, Buy Chocolates online India, Online Cake Delivery in India, India Cakes, Send Cake Online, Birthday Cake and Flowers, Cake Delivery Online, Send Flowers to Pune , Online Cake Delivery in Pune , Send Flowers to Jaipur , Online Cake delivery in Jaipur , Send Flowers to Goa , Online Cake delivery in Jaipur, Send Flowers to Mumbai , Online Cake delivery in Mumbai , Send Flowers to Delhi , Online Cake delivery in Delhi , Send Flowers to Bangalore, Online Cake Delivery in Bangalore, Online Cake delivery in Meerut , Send Flowers to Meerut, Online Cake delivery in Ludhiana , Send Flowers to Ludhiana

  Send Flowers to India
  Send Flowers to Pune, Flower Delivery in Pune, Flower Delivery Pune, Online Flower Delivery in Pune, Flowers Delivery in Pune, Flowers to Pune, Pune Flower Delivery, Online Flowers Delivery in Pune, Send Flowers to India, Flowers to India
  Send Flowers to Pune

  Online Cake Delivery in Pune, Cake Delivery in Pune, Cake shops in Pune, Midnight Cake Delivery in Pune, Order Cake Online Pune, Online Cake Order in Pune, Best Cake Shop in Pune, Send Cake to India, Cakes to India ,Send Cakes to India

  Online Cake Delivery in Pune


  Send Flowers to India, Send Flowers in India, Send Flowers online India, Sending flowers to India, Flowers in India, Send Flowers online to India, Send cakes to India, Buy Chocolates online India, Online Cake Delivery in India, India Cakes, Send Cake Online, Birthday Cake and Flowers, Cake Delivery Online, Send Flowers to Pune , Online Cake Delivery in Pune , Send Flowers to Jaipur , Online Cake delivery in Jaipur , Send Flowers to Goa , Online Cake delivery in Jaipur, Send Flowers to Mumbai , Online Cake delivery in Mumbai , Send Flowers to Delhi , Online Cake delivery in Delhi , Send Flowers to Bangalore, Online Cake Delivery in Bangalore, Online Cake delivery in Meerut , Send Flowers to Meerut, Online Cake delivery in Ludhiana , Send Flowers to Ludhiana

  Send Flowers to India


  Send Flowers to India, Send Flowers in India, Send Flowers online India, Sending flowers to India, Flowers in India, Send Flowers online to India, Send cakes to India, Online Cake Delivery in India, India Cakes, Send Cake Online, Send Flowers to India, Flowers to India, Send Cakes to India, Online Cake Delivery in India

  ReplyDelete
 2. We are urgently in need of kidney donors with the sum of $500,000.00 USD (3 crore) and Also In Foreign currency. Apply Now!,For more info Email:
  healthc976@gmail.com

  ReplyDelete
 3. Thank you for sharing such great information.
  It has help me in finding out more detail aboutonline cake delivery in mumbai

  ReplyDelete