
अंड आणि त्याला पडलेलं छोटसं भोक आणि त्यातून कोणीतरी अन्नरस शोषून घेतल्याची फ्रेम... लहान मुलांचं होणारं शोषण यावर काढलेला हा फोटो पाहिल्यावर मन विचार करायला लागतं..
काळसर तपकिरी रंगाची विंचवाची मादी आणि तिच्या पाठीवर असलेली छोटसं पिल्लू... आक्रमकतेने दंश करण्यासाठी तयार असलेला हिरवा साप... निसर्गातल्या विविध वन्य प्राण्यांना आपल्या कॅमेरारूपी डोळ्यांनी टिपलंय ठाण्यातल्या तरुण वाइल्डलाइफ फोटोग्राफर वेदवती पडवळने.

युरोप खंडामध्ये २४ मे 'नॅशनल पार्क डे' म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने तिथे जगभरातल्या नामांकित फोटोग्राफर्सची निवडक छायाचित्र प्रदशिर्त केली जातात. गेली दोन वर्षं वेदवतीचे फोटो या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात प्रदशिर्त होत आहेत. 'फोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडिया'च्या बाराव्या आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी प्रदर्शनात तिचे फोटो रसिकांच्या पसंतीस उतरले होते. गेल्या वषीर् केरळमध्ये 'बटरफ्लाय आर्ट फाऊंडेशन'ने भरवलेल्या प्रदर्शनात तिला 'सटिर्फिकेट ऑफ एक्सलन्स'ने सन्मानित केलं होतं. ४९व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनातही तिची छायाचित्रांना रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.
वेदवती जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ आर्टच्या कमशिर्यल आर्ट शाखेची पदवीधर. फोटोग्राफी हा तिचा खास विषय आणि तिची पॅशन. गेली पाच वर्षं सातत्याने ती फोटोग्राफी करत आहे. त्यातही नेचर आणि वाइल्डलाइफ फोटोग्राफी हा तिचा आवडता विषय. ठाण्यातले वाइल्डलाइफ फोटोग्राफर युवराज गुर्जर यांच्यासोबत ती साताऱ्याजवळच्या कास पठारावर गेली होती. तिथे तिथला निसर्ग आणि तिथल्या अद्भुत वन्यजीवनाशी, सजीवांशी परिचय झाला. जंगलातली जैवविविधता, निसर्गाचे विभ्रम यांनी तिच्या मनाला भुरळ घातली आणि तिचा वाइल्डलाइफ फोटोग्राफीचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. भारतातल्या गोरूमारा, गीर, वेलावदार, जिम कॉबेर्ट, कान्हा, बांधवगड, भरतपूर, रणथंबोर, बोंडला अशा अनेक जंगलांत आणि अभयारण्यांमध्ये जाऊन तिने आपली 'पॅशन' जपली. याकाळात तिने वन्यप्राण्याचं जीवन आपल्या कॅमेऱ्याने अत्यंत कल्पकतेने टिपलं. त्यातही तिने टिपलेले वाघांचे फोटो पाहण्यासारखेच आहेत. वाघांचे फोटो काढणं ही तिची खास आवड असल्याचं ती सांगते.
आपलं वेड जोपासण्यासाठी ती दर रविवारी येऊरच्या जंगलामध्ये फिरायला जाते. तिथेच तिला एक नवी वाट मिळाली ती 'मायक्रो' फोटोग्राफीची. यामध्येही तिने आपलं कसब दाखवलं आहे. कमी वयात वेदवतीने आपल्या करिअरचा खूप पुढचा टप्पा गाठला असून तिने व्यवसाय म्हणूनही हेच क्षेत्र निवडलं आहे. ठाण्यात तिचा स्वत:चा स्टुडिओही आहे.

- प्रकाश पिटकर
Story

No comments:
Post a Comment